![]() |
संकल्प चित्र- फुलदाणी |
संकल्प चित्र-
दिलेल्या बाह्य आकारात ( उदा. डिश, फुलदाणी, पतंग इ. ) दिलेल्या घटकांचा ( उदा. भौमितिक आकार, नैसर्गिक आकार ) वापर करून चित्र तयार करणे. चित्र तयार करणे म्हणजे आकाराची मांडणी, सजावट, आकर्षक रंगसंगती इ. बाजूंचा विचार संकल्प चित्रात होतो.
आज आपण फुलदाणीच्या बाह्य आकारात भौमितिक आकारांचा उपयोग करून संकल्प चित्र तयार करून आकर्षक रंगसंगतीचा वापर करणार आहोत.
संकल्प चित्र तयार करताना काही मुद्दे लक्षात असू द्या.
- कागदाच्या मध्यभागी दिलेल्या मापात बाह्यआकार काढा.
- बाह्य आकाराचे माप दिले नसल्यास पेपरला शोभेल असा मोठा आकार काढावा.
- दिलेले घटक मोठ्या आकाराचे व एकमेकांना आच्छादनारे (OVERLAPPING) काढावेत.
- आकार एकमेकांवर आच्छादित केल्याने नवीन आकारांची निर्मिती होते.
- लहान मोठे आकार काढताना व आकारांचे आच्छादन करताना चित्राचा समतोल राखा.
- अपारदर्शक जलरंगाने रंगकाम करताना शक्यतो चित्राला OUTLINE देऊ नका.
- रंगांच्या छटा देतांना उजळ व गडद रंग-छटांचा समतोल राखा.
- उजळ रंग व रंग-छटा हे हलके तसेच गडद रंग व रंग-छटा वजनदार असतात.
![]() |
संकल्प चित्र- फुलदाणी रेखांकन |
![]() |
नमुना चित्र- रंगकाम संकल्प चित्र- फुलदाणी |
![]() |
नमुना चित्र- 2 संकल्प चित्र- फुलदाणी |
VIDEO LINK- 2
![]() |
नमुना चित्र- 3 संकल्प चित्र- फुलदाणी |
VIDEO LINK- 3
![]() |
नमुना चित्र- 4 संकल्प चित्र- फुलदाणी |
VIDEO LINK- 4
![]() |
नमुना चित्र- 5 संकल्प चित्र- फुलदाणी |
VIDEO LINK- 5
![]() |
नमुना चित्र- 6 संकल्प चित्र- फुलदाणी |
VIDEO LINK- 6
![]() |
नमुना चित्र- 7 संकल्प चित्र- फुलदाणी |
VIDEO LINK- 7
0 Comments